उन्हाळी सुट्टीमध्ये विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीर
- by Aajchi Navi Mumbai
- May 09, 2025
- 311
नवी मुंबई ः महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षण विभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये विविध खेळ तसेच खेळामधील बारकावे शिकता यावेत याकरिता विविध खेळांच्या विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना कबड्डी, खो-खो, तायक्वांदो व फुटबॉल या खेळांची मोठ्या प्रमाणात आवड असल्याने व त्यामध्ये गती असल्याने त्यांना या खेळाबाबत तंत्रशुद्ध माहिती मिळावी व शास्त्रशुध्द प्रशिक्षण लाभावे याकरिता सदर उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये 4 क्रीडा प्रकारांतील तज्ज्ञ व अनुभवी क्रीडा मार्गदर्शकांकडून खेळातील बारकावे शिकायला मिळत असल्याने त्याचा फायदा नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच मिळणार आहे व याचा उपयोग महानगरपालिकेची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचाविण्यासाठी होणार आहे.
यामध्ये कबड्डी खेळाचे प्रशिक्षण नमुंमपा शाळा क्र. 76/105 घणसोली येथे व खो-खो खेळाचे प्रशिक्षण नमुंमपा शाळा क्र.41 अडवली- भुतवली येथे तसेच फुटबॉल व तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण नमुंमपा शाळा क्र.36/122 कोपरखैरणे या शाळांमध्ये दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष लाभ कबड्डी खेळासाठी 31, खो-खो साठी 28 व तायक्वांदोसाठी 89 तसेच फुटबॉल खेळासाठी 86 अशाप्रकारे एकूण 234 मुले व मुली घेत आहेत. या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीने प्रशिक्षणाच्या ठिकाणी सकस नाश्ता तसेच टी- शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट अशा खेळाचा पोशाख देण्यात आला आहे. 2 मे पासून सुरू झालेले हे शिबीर 15 मे पर्यंत सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत संपन्न होत असून प्रत्येक खेळाकरिता 02 अनुभवी प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या प्रशिक्षकांसोबत क्रीडा विभागातील सहा. मार्गदर्शक तसेच प्रशिक्षकही हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मदत करत आहेत. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यासाठी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे व शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले असून या क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन करीत प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सदर विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व क्रीडा विभागातील इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai