Breaking News
स्ट्रक्चरल ऑडिट करुन 30 सप्टेंबरपूव अहवाल पाठविण्याचे आवाहन
नवी मुंबई ः महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2024-25 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण 527 इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. 30 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महापालिकेकडे सादर करायचे आहे. या प्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था,मालक,भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये 25,000 अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतूद अंतर्भूत करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण दि.30.09.2025 पूव पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महापालिका यांच्याकडे सादर करावयाचा आहे. धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घराचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील असे पालिकेने सूचित केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai