आदिती तटकरेंवर आणखी एक जबाबदारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, पर्यटन, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात आला होता. यानंतर रविवारी त्यांच्याकडे विधी व न्याय या आणखी एका खात्याचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून रविवारी याबाबतचे पत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे आता आदिती तटकरे यांच्याकडे तब्बल आठ खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.