शिवसेनेच्या नेत्यांचे मंत्रिपद रद्द

बई : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार रवींद्र वायकर यांना मंत्रीपदाचा देण्यात आलेला दर्जा राज्य सरकारला काढून घ्यावा लागला आहे. रवींद्र वायकर यांची 11 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तर 14 फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. 

खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्यांवरून अधिवेशनात विरोधकांकडून कोंडी होणार त्याआधीच ऑर्डर काढून या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांच्या नियुक्तीचा आदेशात वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख होता. तोच प्रामुख्याने या नियुक्त्यांमध्ये वादाचा विषय ठरला.