वाशीतील आकर्षक शिल्पाची दुरवस्था
- by मोना माळी-सणस
- Sep 09, 2025
- 176
नवी मुंबई ः स्वच्छ अभियानानिमित्त पालिकेच्यावतीने शहरातील चौकाचौकात विविध आकर्षक शिल्प उभारली आहेत. ही शिल्प शहराच्या सौंर्द्यात नक्कीच भर घालत असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र सध्यस्थिती मागील 8 दिवसांपासून वाशीतील सेक्टर 17 येथील सायन-पनवेल महामार्गालगत असलेले एक शिल्प एका बाजुला कलंडले एसून कोणत्याही क्षणी ढासळू शकते ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारु शकत नाही. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देऊन त्वरीत या शिल्पाची दुरुस्ती करावी जेणेकरुन संभाव्य दुर्घटना टळू शकते अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
पालिकेने स्वच्छ अभियानानिमित्त नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून शहराचे सौंर्द्यही जपण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून अनेक शिल्प शहरात उभी केली आहेत. ज्यामध्ये यंत्रभागापासून फ्लेमिंगो, घोड्याची प्रतिकृती, महात्मा गांधींजीचा चष्मा व चरखा, मेडिटेशन करणारा मानव असे विविध पुतळे तयार कले आहेत. ऐरोलीतील दिवा कोळीवाडा चौकापासून ते बेलापुर पर्यंत शहरांतअर्गत विविध चौकात आकर्षक शिल्प उभारली आहेत. त्याचप्रमाणे पामबीच मार्गावरही अशी अनेक शिल्प साकारली आहेत जी शहराचे सौंर्द्यीकरणात अधिक भर घालत आहेत. मात्र स्वच्छ अभियान संपले की या शिल्पांच्या दुरुस्तीकडे व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते असे अनेकदा या प्रतिकृतींकडे पाहिल्यावर दिसते. रस्त्यालगत ही शिल्प असल्याने पक्षांची विष्ठा, धुळ यामुळे ही शिल्प अस्वच्छ दिसतात. ऊन, पाऊस यांचा मारा सहन करत ही शिल्प काही वर्षांपासून शहराच्या वैभवात भर घातल आहेत.
वाशी हायवे सिग्नल सेक्टर 17 मध्ये येथील चौकात एकावर कर रचलेली पुस्तके आणि त्यावर स्वच्छंदपणे उभी राहणारी चिमुकली व पुस्तक वाचण्यात मग्न असलेला मुलगा हे शिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेते. ज्ञान आणि शिक्षण व्यक्तींना उंचावते, पुस्तके ही सक्षमीकरणाचा पाया आहेत अशा अनेक संकल्पना या एका शिल्पातून मांडल्या आहेत. मात्र सध्यस्थितीत या शिल्पाची दुरवस्था झाली आहे. हे शिल्प एका बाजुला झुकले आहे. मुसळधार पाऊस, वारा आला तर हे कोणत्याही क्षणी ढासळू शकते अशा स्थितीत सध्या ते उभे आहे. पदपथालगत असल्याने हे शिल्प कोसळल्यास अपघात होऊन नागरिकांना हानी पोहचू शकते. त्यामुळे पालिकेने याची दखल घेऊन या शिल्पाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस