फोर्टिस रुग्णालयाची हृदयविकार प्रतिबंध आणि उपचारात प्रगती
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 29, 2025
- 210
तातडीने निदान व सामूदायिक पातळीवर उपाययोजनांमुळे अनेकांना जीवनदान
नवी मुंबई ः जागतिक हृदय दिनानिमित्ताने वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालय व्यवस्थापनाकडून दिल्या जाणाऱ्या रुग्णसेवेची माहिती देण्यात आली. फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने नवी मुंबईत हृदयासंबंधित आजारांच्या उपचारांत सर्वोत्तम सुविधा देण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रायमरी अक्युट मायोकार्डियल इन्फार्क्शन देणे (पीएएमआय) या महत्त्वपूर्ण उपचारपद्धतीमुळे विविध भागांमध्ये हृदयविकाराच्या तातडीच्या उपचारांना गती मिळाल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे. हृदयविकाराशी संबंधित सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी फोर्टिस रुग्णालय प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलच्या नव्या उपक्रमामुळे नवी मुंबईतील रुग्णांमध्ये हृदयविकारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश मिळाले आहे. येथील डॉक्टरांनी रुग्णांची वेळेवर तपासणी व्हावी, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर तत्काळ आपत्कालीन उपचार सेवा दिल्या जाव्यात, हृदयासंबंधीत आजारांवर मात करण्यासाठी विविध समूहांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर दिला. या उपक्रमाबाबत वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अनिल पोतदार म्हणाले, रुग्णालयाने परिसरातील 5 किलोमीटरच्या परिसरातील नर्सिंग होम्ससोबत भागीदारी केली आहे. रुग्णाला प्रायमरी अक्युट मायोकार्डियल इन्फार्क्शन देणे (पीएएमआय) हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रुग्णाच्या हृदयाचा रक्तपुरवठा अचानक थांबल्यास हृदयाचा तीव्र झटका येण्याचा संभाव्यता असते. या स्थितीत रुग्णाला जलदरित्या विशेष उपचार उपलब्ध केले जातात त्याला पीएमआय असे संबोधले जाते. या उपचारपद्धतीमुळे आपत्कालीन हृदयविकाराची परिस्थिती हाताळणे सोप्पे झाले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तातडीने उपचार देणे आता शक्य झाले आहे. या नव्या उपक्रमामुळे रुग्ण हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आल्यापासून डॉक्टरांनी त्यांची बंद झालेली धमनी उघडून शस्त्रक्रिया करण्याच्या वेळेत कमालीची घट केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ही वेळ 71 मिनिटे होती. यंदाच्या 2025-26 वर्षांत ही वेळ केवळ 54 मिनिटांपर्यंत दिसून आली.
वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट सल्लागार डॉ. प्रशांत पवार म्हणाले, ‘नागोठणे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रेडमिल टेस्ट मशीन्स बसवल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांचे निदान लवकर होत आहे. या भागांत गेल्या वर्षी जून महिन्यापासून आतापर्यंत 625 टीएमटी चाचण्या झाल्या. यापैकी 65 रुग्णांमध्ये हदयविकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजाराचे निदान झाले. निदान झालेल्या सर्व रुग्णांच्या पुन्हा आवश्यक तपासण्या झाल्या. त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. लवकर निदान व योग्य उपचारांमुळे संभाव्य हृदयविकराच्या झटक्यांना प्रतिबंध करु शकलो. मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच रुग्णांचे प्राथमिक टप्प्यातच निदान होणे आवश्यक असते. या उपक्रमामुळे चांगला सकारात्मक परिणाम दिसून आला. हृदयविकाराशी संबंधित मृत्यूदरात लक्षणीय प्रमाणात घट नोंदवली गेली. रुग्ण गोल्डन पिरिएडमध्ये उपचारांसाठी येत असल्याने त्यांचे जीव वाचवता येणे शक्य झाले आहे. हे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही सुधारणा दिसून येत आहे.’
- परिचारिका प्रशिक्षण कार्यक्रम
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने नवी मुंबईतील आपत्कालीन हृदयविकाराच्या उपचारांना बळ देण्यासाठी परिचारिका प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 50 परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आता नवी मुंबईत हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तातडीने आणि प्रभावीपणे उपचार देण्याच्या उपचारपद्धतीत वाढ झाली आहे. नागोठणे, पलावा, खोपोली, पनवेल आणि रोहा येथे दर महिन्याला आयोजित होणाऱ्या बाह्यरुग्ण तपासणी शिबिरांमध्ये सुमारे 130 रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाते. - डोन्ट मिस द बीट कार्यशाळा
फोर्टिस हिरानंदानीचे सेवा संचालक नितीन कमारिया म्हणाले, “नवी मुंबईतील अनेकांच्या हृदयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जागतिक हृदयदिनानिमित्ताने या रुग्णसेवेची बांधिलकी व्यक्त करण्याची संधी मिळते. या दिनानिमित्ताने आम्ही डोन्ट मिस द बीट या संकल्पनेवर आधारित कार्डिओलॉजी कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेत उपस्थित राहणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले गेले. कार्यशाळेत आरोग्यसेवा व्यावसायिक, आपत्कालीन प्रतिसादकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी हजेरी लावली होती. यात तीव्र कोरोनरी सिंड्रोम, पीएएमआय मार्ग आणि मूलभूत आणि अत्याधुनिक कार्डियाक लाइफ सपोर्ट, हॅण्ड ऑन ट्रेनिंगबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai