सिडको अधिकारी व कर्मचाऱ्यांना सत्यनिष्ठतेची शपथ
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 35
नवी मुंबई ः 27 ऑक्टोबर 2025 रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी उपस्थित कर्मचारी आणि अधिकारी यांना सत्यनिष्ठतेची शपथ दिली. या प्रसंगी बोलताना विजय सिंघल यांनी दक्षता सप्ताह ही औपचारिकता न राहता दैनंदिन कामकाज पार पाडताना देखील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून पारदर्शकता जोपासायला हवी असे आवाहन केले. सुरेश मेंगडे यांनी सिडको प्रशासनामधील पारदर्शकता अधिक वाढीस लागावी याकरिता दक्षता विभागातर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
सिडकोतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘दक्षता : आमची सामायिक जबाबदारी’ या विषयावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सप्ताहाच्या जनजागृतिसाठी प्रभात फेरी, के. के. वरखेडकर यांचे ‘कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग : सिलेक्शन ऑफ इक्विटेबल कंडिशन्स ॲण्ड इनकॉर्पोरेशन ऑफ सीव्हीसी गाईडलाईन्स टू एन्श्युअर फेअरनेस विथ ट्रान्सपरन्सी’ या विषयावर व्याख्यान, सुशील गुप्ता यांचे ‘डिस्प्युट रेझोल्युशन बाय वे ऑफ रिकन्साइलेशन ॲण्ड आरब्रिट्रेशन विथ ट्रान्सपरन्सी’ या विषयावरील व्याख्यानदेखील आयोजित करण्यात आले आहे.
- के. के. वरखेडकर यांचे व्याख्यान संपन्न
सिडकोचे मुख्यालय असलेल्या सिडको भवन येथे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी के. के. वरखेडकर, माजी मुख्य अभियंता, सिडको यांचे ‘कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग : सिलेक्शन ऑफ इक्विटेबल कंडिशन्स ॲण्ड इनकॉर्पोरेशन ऑफ सीव्हीसी गाईडलाईन्स टू एन्श्युअर फेअरनेस विथ ट्रान्सपरन्सी’तर कायदेतज्ज्ञ सुशील गुप्ता यांचे ‘डिस्प्युट रेझोल्युशन बाय वे ऑफ रिकन्साइलेशन ॲण्ड आरब्रिट्रेशन विथ ट्रान्सपरन्सी’ या विषयांवर व्याख्यान पार पडले.
आपल्या व्याख्यानमध्ये वरखेडकर यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये असलेले करार मसुदा लेखनाचे महत्त्व विशद करून कराराचा मसुदा सुस्पष्ट असल्यावर करार करणाऱ्या पक्षांमध्ये विश्वास निर्माण होऊन, अधिक वाद निर्माण न होता प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य होते, असे प्रतिपादन केले. गुप्ता यांनी वादांचे निराकरण करण्याकरिता उपलब्ध असलेल्या सलोखा (ॲमिकेबल), न्यायालयीन लढाई (लिटिगेशन), मध्यस्थी (मेडिएशन), समेट (कन्साइलेशन), वाटाघाटी (निगोसिएशन) आणि लोक अदालत या विविध मार्गांबद्दल सविस्तर माहिती दिली.
- नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभातफेरी
केंद्रीय दक्षता आयोगातर्फे भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या निमित्ताने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दक्षता जनजागृती सप्ताहाविषयी नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सिडकोतर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीत डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, तसेच सुरेश मेंगडे, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्यासह सिडकोचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सदर प्रभातफेरी सिडको भवन ते बेलापूर, सेक्टर 11 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या प्रभातफेरीप्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांनी विविध फलक व घोषणा यांच्या माध्यमातून नागरिकांना ङ्गदक्षता : आमची सामायिक जबाबदारीङ्घ या उक्तीचा आपल्या दैनंदिन जीवनात देखील अवलंब करण्याचे आवाहन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai