एपीएमसीच्या सचिव पदी शरद जरे
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 57
सचिव पी.एल.खंडागळे यांची अपर निबंधक सहकारी संस्था पुणे येथे बदली
नवी मुंबई ः राज्य सरकारच्या पणन विभागाने मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) सचिव पी.एल.खंडागळे यांची अपर निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर बदली केली. त्यामुळे रिक्त झालेल्या मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी छत्रपती संभाजीनगर सहकारी संस्थेचे सहनिबंधक शरद जरे यांची नियुक्ती केली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची ओळख असून, या ठिकाणी सध्या प्रशासक राजवट आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक होईल, अशी अपेक्षा असताना पणन संचालकांनी या ठिकाणी थेट स्वतःची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. या निर्णयावर देखिल बराच वादंग निर्माण झाला होता. एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक न घेता प्रशासक नेमला जाणार असल्याची कुणकुण विद्यमान एपीएमसी संचालकांना लागली असल्याने संचालकांनी मुदतवाढीसाठी आधीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने देखील एपीएमसी संचालक मंडळाला मुदतवाढ देत तात्काळ एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, या सर्व न्यायालयीन प्रक्रियेत बाजार समिती प्रशासनाची वकिलांमार्फत न्यायालयात बाजू मांडण्यात एपीएमसी सचिव पी.एल.खंडागळे अपयशी ठरले असल्याची चर्चा एपीएमसी बाजार आवारात होती. ल्या दोन वर्षांपासून डॉ. खंडागळे यांचे नाव बाजार समितीतील गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या प्रकरणांशी जोडले जात होते. बाजार समितीतील प्रलंबित प्रकल्प, रखडलेला पुनर्विकास, बाजार आवारातील रस्ते आणि गटारांचा निकृष्ट दर्जा, फळ बाजरातील थेट सेस आकारणीमुळे झालेले बाजार समितीचे नुकसान आणि शीतगृहांमधील अनियमित कारभारासंदर्भात अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पणन विभागाने त्यांच्या बदलीचा निर्णय घेतल्याने एपीएमसीच्या कारभारात शिस्त आणण्याचा प्रयत्न पणन विभागाकडून झाल्याची चर्चा बाजार समितीत रंगली आहे.
29 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपसचिव नितीन गायकवाड यांच्या आदेशाने पी.एल.खंडागळे यांची अपर निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी शरद जरे यांनी गुरुवारी मुंबई एपीएमसीच्या सचिव पदाची सूत्रे हाती घेतली असून, बाजार समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, शरद जरे यांची ही पदोन्नती सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील काही प्रलंबित प्रकरणांच्या निकालांच्या अधीन राहणार असल्याची अट शासनाने ठेवली आहे. तसेच ही तदर्थ पदोन्नती असल्याने, शासनाला ती कधीही मागे घेण्याचा अधिकारही राखून ठेवण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील प्रमुख बाजारपेठांना लवकरच राष्ट्रीय बाजारचा दर्जा देण्यात येणार आहे. त्यात मुंबई एपीएमसीचे नाव अग्रस्थानी आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पणन विभागाकडून प्रशासन पातळीवर करण्यात आलेले हे बदल महत्त्वाचे मानले जात असून येत्या काळात मुंबई एपीएमसीला राष्ट्रीय बाजार घोषित करण्याच्या कामाला लवकरच गती मिळणार असल्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai