डॉ.संदीप धुरत यांना डि.लीट पदवी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 85
नवी मुंबई : नवोन्मेष, हायड्रोजन तंत्रज्ञान आणि न्यूरोडायव्हर्सिटी समावेशन या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबईतील संशोधक, शोधकर्ता आणि लेखक डॉ.संदीप पी. धुरत यांना डनस्टर स्वित्झर्लंड येथील बिझनेस स्कूलने मानद डॉक्टरेट ही आंतरराष्ट्रीय दर्जाची पदवी प्रदान केली आहे. डॉ.धुरत यांनी कोणत्याही शैक्षणिक नामांकनाशिवाय, केवळ त्यांच्या संशोधन, पेटंट आणि समाजोपयोगी परिणामकारक कार्याच्या बळावर हा सन्मान मिळवला आहे. हा सन्मान मिळवणारे ते भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
डॉ. धुरत यांनी 24 पेटंट्स दाखल केले असून, त्यांच्या संशोधनात हायड्रोजन तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा प्रणाली, आणि सस्टेनेबल इनोव्हेशन यांचा समावेश आहे. त्यांनी वाहनांसाठी सुरक्षित, कॉम्पॅक्ट आणि कार्यक्षम हायड्रोजन स्टोरेज प्रणाली, हायड्रोजन सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाची मानक प्रणाली, न्यूरोडायव्हर्जंट व्यावसायिकांसाठी समावेशक रोजगार मानके आणि कोडिंग सिस्टीम या महत्त्वाच्या नवकल्पना विकसित केल्या आहेत. त्याचप्रमाणे डॉ.धुरत यांनी जगातील पहिल्या अल्ट्रा-थिन, अदृश्य ईअरबड डिझाइन्स तयार केल्या असून त्यात आराम, सुंदरता आणि अत्याधुनिक साउंड टेक्नॉलॉजी यांचा संगम आहे.
लेखक म्हणून डॉ.धुरत यांनी आतापर्यंत 30 पुस्तके प्रकाशित केली आहेत, तसेच, त्यांनी हायड्रोजन व्हेईकल सेफ्टी इन्डेक्स नावाने जगातील पहिले हायड्रोजन वाहन सुरक्षामानक फ्रेमवर्क सादर केले आहे. त्यांच्या कार्याचा देश-विदेशातील अनेक संस्थांकडून गौरव करण्यात आला आहे. डॉ.धुरत यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नाही, तर भारतातील संशोधन आणि नवोन्मेष संस्कृतीला मिळालेला सन्मान असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताला स्वच्छ ऊर्जा, समावेशन आणि नवोन्मेष अर्थव्यवस्थेचा जागतिक नेता बनवण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai