मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 78
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिकेच्यावतीने प्रभागरचना निश्चित करण्यात आली असून नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सुरवातीला 14 नोव्हेंबरला प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या जाणार होत्या परंतू राज्य निवडणूक आयोगाने सुधारीत कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुरुवारी 20 नोव्हेंबरला प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. निवडणूक आयोगाने पुन्हा मतदार यादीचा नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. हरकती घेण्याची गुरुवारपर्यंतची मुदत वाढवून 3 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार केलेली प्रारुप मतदार यादी हरकती व सूचना मागवण्यासाठी प्रसिध्द करण्यात आली होती. नवी मुंबमहापालिकाक्षेत्रात मतदार याद्यांवरुन मोठा गोंधळ निर्माण झाला असून आयुक्त निवास ,सार्वजनिक शौचालय अशा विविध ठिकाणी मतदारांची नावे नोंद झाल्याचे मनसेने दाखवून दिले होते. नवी मुंबई शहरात 1 जुलैपर्यत 9 लाख 48 हजार मतदार नोंदणी आहे. त्याप्रमाणेच प्रारुप मतदार यांद्या प्रसिध्द केल्या आहेत. परंतू आता राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांबाबतच्या कार्यक्रमाला मुदतवाढ देत मतदार यादीबााबतचा नवा कार्यक्रम जाहीर केला आहे.
‘राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबतचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.भागवत डोईफोडे, उपायुक्त ,निवडणूक विभाग, नवी मुंबई महापालिका
असा आहे मतदार यादीबाबतचा कार्यक्रम
- प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख- 27 नोव्हेंबर ऐवजी 3 डिसेंबर 2025
- प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करणे- 5 डिसेंबर ऐवजी 10 डिसेंबर 2025
- मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द- 8 डिसेंबर ऐवजी 15 डिसेंबर 2025
- मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे- 12 डिसेंबर 2025 ऐवजी 22 डिसेंबर
- नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात 1 जुलै 2025 नुसार 9 लाख 48 हजार मतदार असून प्रत्येक प्रभाग हा अंदाजे 35 ते 40 हजार मतदारांचा असेल अशी शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai