150 वाहनांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 118
नवी मुंबई ः एपीएमसी वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे वाहतूक कोंडी करणाऱ्या 150 वाहनांवर विशेष मोहिम अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमध्ये प्रलंबित दंड असलेल्या वाहन चालकाकडून 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती एपीएमसी वाहतुक नियंत्रण शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी दिली.
एपीएमसी वाहतुक नियंत्रण शाखा परिसरामध्ये वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील पाच मार्केट येतात. त्यामुळे एपीएमसी मार्केट परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु असते. एपीएमसी मसाला मार्केट ते माथाडी भवन पर्यंत तसेच माथाडी भवन ते अगदी फळ मार्केटपर्यंत रिक्षा चालक तसेच अन्य वाहने अयोग्य प्रकारे रस्त्यांवर लावण्यात येत असल्याने वाहतुक कोंडी होत होती. दोन मिनिटांचा रस्ता पार करायला अनेकदा पाच ते सात मिनिटे लागत होती. एपीएमसी मार्केटमध्ये जाणारी वाहने तसेच मार्केटमधून बाहेर पडणारी वाहने यांना या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. याप्रकरणी एपीएमसी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ तर्फे भाजीपाला मार्केट समोर सकाळी रिक्षावाल्यांमुळे वाहतुक कोंडी होते, अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेत भाजीपाला मार्केट समोर वाहतुक कोंडी करणाऱ्या वाहनांवर एपीएमसी वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे नियमित कारवाई करण्यात आल्याने भाजीपाला मार्केट समोर होणारी वाहतुक कोंडी कमी झाली. भाजीपाला मार्केट समोर वाहतुक कोंडी करणाऱ्या वाहनांवर एपीएमसी वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे नियमित कारवाई केल्यामुळे व्यापारी वर्गाचे समाधान झाल्याने व्यापाऱ्यांनी एपीएमसी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांचा सन्मान केला. यावेळी जमलेल्या लोकांना वाहतुक नियमांबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी माहिती दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai