आप सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 57
नवी मुंबई ः 10 वर्षांच्या कालावधी नंतर नवी मुंबई मनपा निवडणूक येऊ घातली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीत जिथे पक्ष बदलांच्या चर्चा जोरात सुरु असताना आम आदमी पार्टीने एकला चलो रे! चा नारा देऊन पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
आता पर्यंत झालेल्या मुलाखती घेत प्रभाग निहाय 28 जणांची सूची पक्ष श्रेष्टींकडे पाठवण्यात आली आहे. लवकरच अन्य उमेदवार निवड करण्यात येणार आहे. टीम आप नवी मुंबईतुन महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज असून, 28 उमेदवारांची प्रभागनिहाय प्रथम सूची पक्षश्रेष्टींकडे सुपूर्द केलेली आहे. शिवछत्रपतींचे सुराज्य, बाबासाहेबांचे संविधान आणी दिबा पाटलांचे स्थानीय लोकाधिकार ह्या विचारसरणीवर निष्ठा असणारे सामान्य जनप्रतिनिधी म्हणजेच आम आदमी पार्टी. असा नारा देत भ्रष्ट्राचार मुक्त मनपा हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
टीम आप नवी मुंबई तर्फे, नेहमी प्रमाणे उमेदवार निवड हि आम आदमी पार्टीच्या संहितेनुसार करण्यात येत असून स्वच्छ चारित्र्य, शिक्षण समाजातील स्थान हे पाहिले जाणार आहे. तसेच समाजाच्या विविध थरातील सामान्यजन यांमधून सुशिक्षित, सुसंस्कृत आणि देशप्रेमी नागरिक निवडणूक लढवीत आहेत. ह्या मध्ये उच्च स्तरीय निवृत्त शासकीय अधिकारी, जसे लेबर कमिशनर, आर्किटेक, नेव्ही मुख्य अभियंता, वकील, शिक्षक, समाजसेविका, आय ती क्षेत्रात काम करणारे इत्यादी सामान्य नागरिकांपासून पासून सफाई कामगार नेते, महिला रिक्षा चालक इत्यादी इच्छुक समाविष्ट आहेत.
प्रस्थापित राजकारणातील खोकेबाजी आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेले नवी मुंबईचे सुज्ञ नागरिक, ह्या वेळी तरी पैशांमधून सत्ता आणि सत्तेमधून पैसे हे दुष्टचक्र मोडून काढतील अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई हे एक सुनियोजित शहर असून, ह्या शहराला सिंगापूर-हाँगकाँग सारखे जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी आम आदमी पार्टी सारख्या नवीन विचाराच्या तरुण राजकारण्यांची आवश्यकता असल्याने उमेदवार निवड पारखून केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रदेश सहसचिव श्याम कदम यांनी सांगितले कि, आम आदमी कुठल्यायी युती आघाडीत सामील होणार नाही तसेच मित्र पक्षाच्या नावाखाली युती आघाडी करणार नाही असे प्रदेश अध्यक्ष अजित खटके पाटील यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. 28 प्रभागातील उमेदवार निवड झाली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai