राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 25
वन विभागाची धाड; नगरसेवकावर गुन्हा
नवी मुंबई ः रबाळे एमआयडीसी परिसरातील राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन व रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वन विभागाने कारवाई करत दोन जेसीबी मशिन जप्त केल्या आहेत. संबंधित कारवाई दरम्यान शासकीय कामात हस्तक्षेप करत अडथळा आणल्याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्थानिक नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन परिमंडळ अधिकारी संदीप मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. 97 हा भाग शासनाने राखीव वन म्हणून घोषित केलेला असून, येथे कोणतेही बांधकाम किंवा उत्खनन करण्यास कायदेशीर परवानगी नाही. मात्र तरीही रबाळे एमआयडीसी परिसरातील सर्व्हे नं. 97, यादवनगर, इलवणपाडा भागात राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन व रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू होतेे. यासंबंधिची माहिती मिळताच शासनाच्या वन विभागाने धाड टाकत काम थांबवले व तेथील दोन जेसीबी मशिन जप्त केल्या. घटनास्थळी जेसीबी चालक व कामावर असलेले कर्मचारी उपस्थित होते. मात्र कारवाई सुरु असताना स्थानिक नगरसेवक ममित चौगुले तेथे आले व त्यांनी कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. हे काम नागरिकांना सुविधा पुरवण्याच्या कामाअंतर्गत करत असल्याने कारवाई न करण्यास सांगितले. तसेच शासकीय कामात हस्तक्षेप करत जप्त केलेल्या दोन जेसीबी पैकी एक जेसीबी जबरदस्तीने चालकांसह घेऊन गेले. या घटनेनंतर संबंधित वन अधिकाऱ्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार करुन फिर्याद नोंदवली. या प्रकरणी ममित चौगुले व जेसीबी चालक अनंत धोत्रे यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममित चौगुले हे शिवसेना (शिंदे गट) मधील नगरसेवक आहेत. नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्योन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai