एन्व्हायरोटेक एशिया परिषदेमध्ये पालिकेचे जल व्यवस्थापनावर सादरीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 24
नवी मुंबई ः पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देणारी एन्व्हायरोटेक परिषद 2026 नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संपन्न झाली. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, विविध महानगरपालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, निरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रतिनिधी, संशोधक, सल्लागार आणि धोरणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिषदेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेचे उप अभियंता स्वप्नील देसाई यांनी ‘प्रक्रियाकृत सांडपाणी भविष्यातील जलस्त्रोत’ या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल व माहितीपूर्ण सादरीकरणामध्ये त्यांनी भविष्यातील वाढती पाणीटंचाई, जलस्रोतांवरील वाढता ताण आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी हे पर्यायी व शाश्वत जलस्रोत म्हणून कसे विकसित करता येईल याबाबत सविस्तर मांडणी केली. आधुनिक सांडपाणी उपचार तंत्रज्ञान, तृतीय व चतुर्थ स्तर उपचार, उदयास येणारे प्रदूषक आणि त्यांचे संभाव्य धोके तसेच त्यावरील नियंत्रण व उपाय यावर त्यांनी विशेष भाष्य केले. यासोबतच महानगरपालिकेच्या स्तरावर करता येणाऱ्या व्यावहारिक उपाययोजना व धोरणात्मक दृष्टिकोन यावरही त्यांनी प्रकाश टाकला. सदर परिषदेचे उद्घाटन उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. पी. अनबलगन यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शासनउद्योगस्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जल व्यवस्थापनाविषयी सादरीकरणाचा बहुमान मिळणे ही गौरवशाली बाब आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai