नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स कार्गो हब
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 29
महाराष्ट्राच्या व्यापाराला नवी गती मिळणार
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स च्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थान खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्स ने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचा महत्त्वपूर्ण पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स च्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री म्हणाले की, फेडेक्स च्या कार्गो हबचे भूमिपूजन भारत, महाराष्ट्र आणि मुंबईसाठी पुरवठा व्यवस्थान खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक घटना आहे. जागतिक व्यापारातील बदलत्या परिस्थितीत फेडेक्स ने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय भारत आणि महाराष्ट्राच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. फेडेक्स ची जागतिक स्तरावरील मजबूत उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक व्यस्त प्रवासी व कार्गो विमानतळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल. पुरवठा व्यवस्थान खर्च कमी करणे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून फेडेक्स सारख्या कंपन्यांमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा खर्च कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र हा देशाच्या उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असून फेडेक्स च्या सुविधेमुळे उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक भाषणात अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. चे संचालक जीत अदानी म्हणाले की, फेडेक्सने नवी मुंबईची केंद्र म्हणून केलेली निवड ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. विमानतळाची जवाहरलाल नेहरू बंदर जवळील धोरणात्मक स्थिती आणि अत्याधुनिक कार्गो सुविधा यामुळे हे हब जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल. या प्रकल्पामुळे निर्यातदार, लघु-मध्यम उद्योग, औषध व कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट जोडणी मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल विशेष उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स च्या पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्याधुनिक एअर कार्गो हबचे भूमिपूजन हा भारताच्या जागतिक व्यापार जोडणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. फेडेक्स चा हा भारतातील पहिलाच हब असून, 3 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह उभारला जाणार आहे. फेडेक्स कडून या प्रकल्पात 250 दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येत असून, भारताच्या वाढत्या आर्थिक क्षमतेवरील विश्वासाचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प भारताच्या राष्ट्रीय पुरवठा व्यवस्थान खर्च धोरण आणि पीएम गतिशक्ती योजना उपक्रमाशी सुसंगत असून देशाची पुरवठा व्यवस्थान खर्च क्षमता वाढविण्यास मदत करेल. फेडेक्स चे नेटवर्क सुमारे 220 देशांमध्ये कार्यरत असून, नवी मुंबई हबमुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत अधिक प्रभावीपणे सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- 2 हजार 500 कोटींची गुंतवणूक
फेडेक्स तर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे 3 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी फेडेक्स कडून सुमारे 2 हजार 500 कोटीं रुपायांची दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येणार असून, हा हब भारतासाठी प्रादेशिक पुरवठा व्यवस्थान खर्चाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे. - 6 हजार रोजगार निर्मिती
या सुविधेमुळे भारताचे दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिका या प्रमुख जागतिक बाजारपेठांशी थेट व्यापार संपर्क अधिक मजबूत होणार आहे. हा कार्गो हब पुरवठा व्यवस्थान खर्च, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमध्ये 6 हजार हून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करेल.
- निर्यात-आयात क्षमतेत वाढ
अत्याधुनिक स्वयंचलित सॉर्टिंग सिस्टीम, डायमेन्शनल स्कॅनिंग, हाय-स्पीड स्क्रीनिंग तंत्रज्ञान आणि समर्पित विमान पार्किंग सुविधांमुळे इनबाउंड व आऊटबाउंड शिपमेंटची एकाचवेळी प्रक्रिया शक्य होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी उत्पादने, औषधनिर्मिती आणि नाशवंत वस्तूंसारख्या उच्च-मूल्य व वेळेवर आधारित क्षेत्रांना अधिक विश्वासार्ह आणि जलद सेवा मिळणार आहे. या सुविधेमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात-आयात क्षमतेत वाढ होऊन पुरवठा व्यवस्थान खर्च कमी होण्यास मदत होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कार्गो क्षमता प्रारंभी सुमारे 0.5 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक राहणार असून, पुढील टप्प्यांत ती सुमारे 3.25 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai