स्वच्छतेसाठी मार्गदर्शक शहर म्हणून नवी मुंबईची प्रभावी कामगिरी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 29
नवी मुंबई ः देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराच्या ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये नवी मुंबईचा समावेश असून ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ संकल्पनेमध्ये ‘मार्गदर्शक शहर’ म्हणून नवी मुंबईकडे कन्नड, जिंतूर, केज या 3 नगरपंचायती आणि लोणार व मलकापूर या 2 नगरपरिषदांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अधिकारी यांच्या समुह गटाने नुकतीच या पाचही शहरांना भेटी देत पाहणी केली व स्वच्छता विषयक सुधारणांसाठी मौलिक सूचना केल्या.
या पथकांनी त्या 5 शहरांमध्ये जाऊन तेथील स्वच्छता व्यवस्थापनाची पाहणी केली. त्याठिकाणी असलेली कचरा वर्गीकरणाची पध्दत, कचरा संकलनाची पध्दत, कचरा विल्हेवाटीची व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व्यवस्था, जलस्त्रोत स्वच्छता अशा विविध बाबींची पाहणी करुन त्यामध्ये सुधारणा सुचविल्या. त्याचप्रमाणे माहिती प्रचार व प्रसिध्दी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करणेबाबत सूचना केल्या. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सिटी प्रोफाईलमध्ये दाखल करावयाच्या ऑनलाईन माहितीच्या पध्दतीचीही सविस्तर माहिती देण्यात आली व त्याविषयीच्या शंकांचे समाधानही करण्यात आले.
या पाहणीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत क्षेत्रभेटी दिल्या व स्वच्छता कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधतानाच तेथील नागरिकांशीही सुसंवाद साधून स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली. स्वच्छता ही दररोज करण्याची गोष्ट असल्याने व त्यात नागरिक सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याने त्यावर जास्तीत जास्त भर दयावा व त्यासाठी लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवावेत असे सूचित करण्यात आले. स्वच्छ शहर जोडीमधील पाचही शहरांतील अभ्यासगटाने नवी मुंबई महानगरपालिकेस भेट देऊन येथील घनकचरा व्यवस्थापन प्रणालीतील विविध बाबींची पाहणी करावी व तशा प्रकारचे अनुकरण करावे असे आवाहन त्यांना करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai