‘महिला सक्षमीकरण’ मोहिम
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 24
सहभागी होण्याचे कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे आवाहन
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दि. 09एप्रिल, 2026 पासून पुढील 15 दिवस महिला सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत व्यापक प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश केंद्र व राज्य शासनाच्या महिलाभिमुख योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि लाभार्थ्यांच्या यशोगाथांना व्यासपीठ मिळवून देणे, हा आहे.
कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील ज्या महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा (उदा. महिला बचत गट, कौशल्य विकास, अर्थसहाय्य योजना) लाभ घेऊन आपले जीवन समृद्ध केले आहे, अशा महिला तसेच शासन सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिला यांनी आपली माहिती, फोटो किंवा छोटे व्हिडिओ आपल्या जिल्हयातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभग यांनी केले आहे.
विशेष प्रसिद्धी अभियानासाठी खालील बाबींची आवश्यकता आहे:
- यशकथा योजनेचा लाभ घेवून तुम्ही सुरू केलेला व्यवसाय किंवा प्रगतीबद्दलची माहिती.
- (युझर जनरेटेड कंटेंट): योजनेच्या लाभार्थ्यांनी आपला फोटो किंवा योजनेच्या लाभासोबतचा सेल्फी पाठवावा.
- व्हिडिओ बाईट्स: आपला अनुभव सांगणारा छोटा व्हिडिओ किंवा मुलाखत. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या ईमेल पत्त्यावर पाठवावे.
- या यशोगाथांना स्थानिक वृत्तपत्रे, आकाशवाणी, सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स), आणि डिजिटल ई-बुकलेटच्या माध्यमातून राज्यस्तरावर प्रसिद्धी दिली जाणार आहे. स्थानिक इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातूनही या मोहिमेचा प्रचार करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai