मैदानांवर अतिक्रमण केलेल्या 13 शाळांना सिडकोची नोटीस
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 30
नवी मुंबई ः मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी सिडकोने शाळांच्या मैदानांवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू केली आहे. अशा 13 शैक्षमिक संस्थांना नोटीसा पाठवून सदर अतिक्रमण हटविण्याची सूचना केली आहे.
शैक्षणिक भूखंड वाटप करताना भाडेपटट्टा व भाडेतत्वावर अशा दोन पद्धतीने भूखंड दिले आहेत. मात्र काही संस्थांनी शाळांची मैदाने ही मर्यादित ठेवत नागरिकांना प्रवेश देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेनंतरही मैदानांचा वापर नागरिकांना, खेळाडूंना करता येत नाही. त्यामुळे तक्रारी वाढल्या होत्या. त्याचा दखल घेऊन सिडकोने सर्वेक्षण सुरु केले. यामध्ये सदर ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. सिडकोच्या शहर विकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 13 शैक्षणिक संस्थांच्या मैदानांवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये ऐरोली येथील 7, कोपरखैरणेतील 4, घणसोली व सीबीडी बेलापुर येथील 2 अशा शाळांचा समावेश आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थांना नोटिसा बजावून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवून मैदाने मोकळी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुलांना खेळासाठी सुरक्षित व मोकळी जागा उपलब्ध करून देणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश आहे. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा सिडकोने दिला आहे. मैदानांचा अनधिकृत वापर सहन केला जाणार नसून नियोजित शहरी विकास व नागरी सुविधांचे संरक्षण करण्यासाठी सिडको कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता उन्हाळी सूट्टी पडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही मैदाने मोकळी व्हावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच सिडकोने पाठवलेल्या नोटीसा ही केवळ कागदोपत्री मर्यादित न राहता त्यावर प्रत्यक्ष कारवाई व्हावी अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai