1755 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 18
नवी मुंबई ः नवी मुंबई शहरामध्ये रिक्षांची संख्या वाढल्यामुळे अनधिकृत रिक्षा थांबे वाढले आहेत. तसेच जादा प्रवाशी भरणे, भाडे नाकारणे, सिग्नल उल्लंघन करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालवणे असे विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1755 रिक्ष्ाा चालकांवर कारवाई करण्यात आली.
बेशिस्त रिक्षा चालक रिक्षा जागोजागी थांबवत असल्याने वाहतुक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर 27 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कारवाई करण्यात आली. काही रिक्षा चालक भाडे नाकारणे, अतिरिक्त भाडे घेत असल्याने प्रवासी त्रस्त होत आहेत. बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्याकरीता दिनांक 27 ते 30 एप्रिल 2026 या चार दिवसांच्या कालावधीत संपुर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात, नवी मुंबई वाहतुक विभागातील सर्व युनिट प्रभारी अधिकारी यांनी आप आपले वाहतुक युनिटकडील जास्तीत जास्त अधिकारी व अंमलदार नेमुन विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत भाडे नाकारणे-404, विरुध्द दिशेने वाहन चालविणे-15, रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने रिक्षा पार्क करणे-100, जादा प्रवासी वाहतुक-885, सिग्नल उल्लंघन 44, गणवेष परिधान न करणे-143 तसेच इतर कारवाई-154 अशा कारवाई करण्यात आलेल्या आहेत. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व युनिटच्या हद्दीमध्ये मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या एकुण 10 वाहन चालकांविरुध्द करवाई केलेल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai