कर्मचाऱ्यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 20
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत, राष्ट्रध्वजवंदन संपन्न झाले. यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणाऱ्या कामगारांना सन्मानीत करण्यात आले.
शासन परिपत्रकानुसार प्रथम ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत आणि तद्नंतर 19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करुन मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त, इतर विभागांचे उपायुक्त आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच सर्व अधिकारी - कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई पालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणऱ्या कामगारांना सन्मानीत करण्यात आले. यामध्ये सविता धोत्रे, भिमराव कांबळे, विदेश कोळी, बाळु बनकर, विजय कांबळे या घनकचरा व्यवस्थापन विभागातील तसेच ऋषी कोळी (पाणी पुरवठा विभाग), संतोष दिघे (उदयान विभाग),सुनिता बोबडे (रुग्णालय आरोग्य विभाग), अरुण मलपेकर (नागरी आरोग्य केंद्र आरोग्य विभाग), दिपक शेरखान (मलनि:सारण विभाग) या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत संतांची व महावीरांची भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्राला सामाजिक कार्याच्या माध्यमातून व पर्यावरणाचे भान राखून पुढे नेऊया असे आवाहन केले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहीमेअंतर्गत प्लास्टिकपासून पुनर्निर्मित केलेले बेंचेस बनविण्यात आलेले असून अशा विविध उपक्रमांतून आपण नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त व पर्यावरणशील बनवूया असे महापौरांनी सांगितले. आजपासून सुरु होत असलेल्या जनगणनेच्या कामामध्ये सर्व नागरिकांनी देशाच्या विकासासाठी सहभागी होऊन सहकार्य करावे असेही आवाहन महापौर महोदयांनी यावेळी केले. पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतांनाच श्रमाला महत्व देणे ही आपली संस्कृती असल्याचे सांगितले. आजपासून स्वयं जनगणनेला सुरुवात होत असून प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभागी होऊन सत्य माहिती भरावी आणि 14 जूनपासून घरी येणा-या प्रगणकांनाही ही माहिती पुरवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने नवी मुंबईतून संकलित प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करुन बनविलेल्या प्लास्टिक बेन्चेसचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमासाठी गॅलेक्सी लिमिटेडने संघटनेस सीएसआर निधी उपलब्ध करुन दिला आहे. या प्रसंगी स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदुम तसेच गॅलक्सी लिमीटेडचे अमित गोरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai