वाढत्या ‘महागाई’ने बजेट गॅसवर
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 20
व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ; हॉटेल, खानावळी महागणार
मुंबई ः जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर आता त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर जाणवू लागला आहे. युद्धामुळे इंधन, अन्नधान्य आणि आयात-निर्यात खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या दरांवर दिसू लागला आहे. वाढत जाणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे रोजचे बजेच मात्र गॅसवर आले आहे.
पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपताच महागाईचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. 1 मे 2026 पासून सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सुमारे एक हजार रुपयांची मोठी झाली आहे. परिणामी, रेस्टॉरंट मालकांना मेन्यू दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. ग्राहकांमध्ये या वाढत्या दरांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये, व्यावसायिक एलपीजीच्या किमती आता 3,000 चा टप्पा ओलांडून पुढे गेल्या आहेत. तथापि, या वेळी घरगुती गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. व्यावसायिकांच्या मते, गॅस सिलिंडर, खाद्यतेल, भाज्या तसेच इतर कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर वाहतूक खर्चही वाढल्याने एकूण ऑपरेशनल खर्च वाढला आहे. रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या मते, गेल्या काही महिन्यांत कच्च्या मालाच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून व्यवसाय टिकवण्यासाठी दरवाढ अपरिहार्य झाली आहे. दुसरीकडे, ग्राहकांमध्येही या वाढत्या खर्चाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, युद्धस्थिती दीर्घकाळ टिकल्यास महागाईचा हा दबाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे ‘आउटडोअर डायनिंग’ हा पर्याय मर्यादित होत जाऊन घरगुती जेवणाकडे लोकांचा कल वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारकडून महागाई नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा परिणाम दिसण्यासाठी काही काळ लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमधील वाढ वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी दिसून आली आहे. व्यावसायिक सिलिंडर्सच्या किमतींमधील या वाढीमुळे सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामात सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.
- पेट्रोल, डिझेल दरवाढीकडे लक्ष
आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढून प्रति बॅरल 126 डॉलर या चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. मात्र आता त्यात घट झाली असली तरी किमती अजूनही 110 डॉलर प्रति बॅरलच्या वरच आहेत. तसेच होर्मुज सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे आता आगामी काळात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होत असून त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai