राज्याचा दहावीचा निकाल 92.09 टक्के
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 26
मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल
मुंबई ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी, ता 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर होणार आहे. राज्याचा दहावीचा निकाल 92.09 टक्के इतका लागला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल असून 97.62 टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी 88.41 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 94.96 टक्के तर मुलांची 90.56 टक्केवारी आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाच्या प्रतीक्षेत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातून 6 हजार 612 शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 4 लाख 82 हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 10,031 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,912 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 9,042 दिल्यां विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 91.22 आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याथ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62%) सर्वाधिन असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 17) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.96 असून मुलांची टक्केवारी 89.56 आहे. म्हणजेच मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.40 ने जास्त आहे. माध्यमिक शालान्त (इ.10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 करीता एकूण 64 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण 20 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे.
दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी
- मुलींची टक्केवारी 94.96 टक्के
- मुलांची टक्केवारी: 90.56 टक्के
- मुलींचा निकाल 94.96 टक्के तर मुलांची 90.56 टक्केवारी
विभागनिहाय आकडेवारी समोर
- कोकण : 97.62 टक्के
- पुणे : 94.24 टक्के
- नागपूर : 89.07 टक्के
- मुंबई : 94.97 टक्के
- कोल्हापूर : 95.47 टक्के
- अमरावती : 90.50 टक्के
- नाशिक : 90.53 टक्के
- लातूर : 88.42 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 88.41 टक्के
एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी : 15 लाख 55 हजार 026
उत्तीर्ण विद्यार्थी : 14 लाख 20 हजार 486
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai