आ. गणेश नाईक यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2026
- 21
नवी मुंबई ः वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी सखल भागातील पाणी निचरा, नाले साफसफाई, धोकादायक विद्युत यंत्रणांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच आरोग्य आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. तसेच शाळांची सुरक्षा, औषधसाठा, सर्पदंश प्रतिबंधक लसी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
आगामी पावसाळ्यात नवी मुंबईतील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आ. गणेश नाईक यांनी वाशी येथे मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करुन महापालिका प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले. वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये पार पडलेल्या या बैठकीत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश नाईक यांनी दिले. विशेषतः नाले, गटारे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांची साफसफाई वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या. पावसाळ्यात शॉर्टसर्कटिमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी उघड्या विजेच्या तारा, डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर, धोकादायक विद्युत यंत्रणांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच रस्त्यांलगत आणि वस्ती परिसरातील झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करुन संभाव्य दुर्घटना टाळण्यावरही भर देण्यात यावा. शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शाळा इमारतींची तीं दुरुस्ती पूर्ण करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करण्याच्या सूचनाही नाईक यांनी दिल्या. दरम्यान, पावसाळ्यापूर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी लवकरच लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही आ. गणेश नाईक यांनी यावेळी दिली.
मुसळधार पावसामुळे डोंगराळ परिसरातून मातीचे लोंढे खाली येऊन डोंगर पायथ्याशी आणि खाणी परिसरातील झोपड्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. पावसाळ्यात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी. महापालिकेच्या रुग्णालयांमधून नवी मुंबईतील रुग्णांना प्राधान्याने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. - ना. गणेश नाईक, वनमंत्री तथा ठाणे जिल्हा संपर्कमं
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai