एनएमएमसी व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवेला वाढती पसंती
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2026
- 32
नवी मुंबईः महापालिकेच्या व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवेचा लाभ महापालिकेशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मोठया प्रमाणावर होत असून अल्पावधीतच ही अत्याधुनिक डिजीटल सेवा नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. व्हॉट्स ॲप चॅटबॉट असून आजच्या डिजीटल युगात नागरिकांशी जोडणारे हे एक अत्यंत प्रभावी व स्वयंचलित माध्यम आहे. पालिकेने 8291920504 या क्रमांकावरील व्हॉट्स ॲप चॅटबॉटव्दारे विविध सेवा एकात्मिक स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेशी संबधित कामांसाठी कोणत्याही महापालिका कार्यालयात प्रत्यक्ष जावे न लागता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे भर दिला जात आहे. या अनुषंगाने शासनाने अधिसूचित केलेल्या 68 लोकसेवांसह आणखी 45 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून बांधकाम परवानगी प्रमाणपत्र अशा विविध 113 सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामधील एक महत्वाची सुविधा म्हणजे यामध्ये, मालमत्ता कर देयके ऑनलाईन उपलब्ध करुन देणे व देयक रक्कम भरणा करणे,पाणीपट्टी देयके ऑनलाईन उपलब्ध करुन देणे व देयक रक्कम भरणा करणे, समाज विकास विभागाच्या 50 हून अधिक लोककल्याणकारी योजनांकरिता एआय सहाय्यक म्हणून सेवा देणे, सर्व लोकसेवांचे अर्ज व्हॉट्स ॲपवर उपलब्ध करुन देणे, मराठीसह इंग्रजी भाषेचा पर्याय असणे अशा विविध सुविधांचा समावेश आहे. व्हॉट्स ॲप चॅटबॉटव्दारे 3 लाखाहून अधिक नागरिकांना मालमत्ता कर भरल्याची सूचना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर देण्यात आलेली आहे.
व्हॉट्स ॲप चॅटबॉट ही ऑनलाईन सेवा 247 उपलब्ध असल्याने नागरिक कार्यालयीन वेळेच्या नंतर त्यांच्या सोयीने अगदी रात्रीही व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही याचा वापर करु शकतात. या सुविधेव्दारे महानगरपालिकेशी संबंधित माहिती, सेवा, देयके याबाबत तात्काळ प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांकडून व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवेचा वापर सातत्याने वाढतांना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे ही सुविधा वापरण्यास सोपी असल्याने व मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध असल्याने नागरिकांना सहज संवाद साधणे सोयीचे होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai