फसवणुक करणाऱ्या फार्म एन लँड कंपनीवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 24
नवी मुंबई ः गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाला ‘फार्म एन लँड’ कंपनीमार्फत जमीन विक्रीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सानपाडा येथील सेक्टर 30 ए मधील जी स्क्वेअर बिझनेस पार्कमधील कंपनीच्या कार्यालयाची आणि संबंधित व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान काही गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये स्वीकारूनही जमीन त्यांच्या नावावर करण्यात आलेली नसल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र नायक याने सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पनवेल परिसरात कमी दरात प्लॉट उपलब्ध असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. गुंतवणूकदारांना साई-पनवेल परिसरातील जागांची पाहणी करून देण्यात आली. काही प्रकरणांत शेतकऱ्यांसोबत व्यवहार सुरू असल्याचे भासवून विश्वास संपादन करण्यात आला. गुंतवणूकदारांकडून पूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया मात्र पुढे नेण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांना जमीन ताब्यात मिळाली नाही किंवा व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही. या प्रकारात सहा गुंतवणूकदारांची एकूण 30 लाख 9 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai