रिक्षाचालकांच्या वादात तरुणाचा बळी
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 20
नवी मुंबई ः घणसोली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या तरुणावर संतप्त आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली रेल्वे स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे रिक्षाचालकांची गर्दी होती. तिथे रिक्षा नेमकी कुठे उभी करायची, यावरून काही रिक्षाचालकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. मात्र, काही वेळातच हा वाद इतका वाढला की रिक्षाचालकांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हाणामारी सुरू असतानाच, परिसरातील एका तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. “भांडण करू नका,“ असे म्हणत तो वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, संतप्त आरोपींचा राग अनावर झाला. त्यांनी भांडण सोडवणाऱ्या या तरुणालाच लक्ष्य केले आणि त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी केलेल्या या बेदम मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घणसोली परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai