मालमत्ता कर संकलनाचा 100 कोटींचा टप्पा पार
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 28
83 हजार नागरिकांकडून 102 कोटींचा भरणा; 31 जुलैपर्यंत 5% सवलतीची संधी
पनवेल ः महापालिकेच्या कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत मालमत्ता कर संकलनात 100 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आतापर्यंत एकूण 83 हजार 52 मालमत्ताधारकांनी 102 कोटी रुपये मालमत्ता कर भरून पालिकेला सहकार्य केले आहे.
पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पालिकेच्या कर संकलन विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षात जून महिन्यातच 100 कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. पालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत असून ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आवाहनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार मालमत्ता धारकांसाठी विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मालमत्ता कर भरल्यास चालू मागणीवर 5% सवलत, तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 2% सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी वेळेत कर भरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मालमत्ता कराची देयके (बिले) तयार करण्यात आली असून त्यांचे वितरण युद्धपातळीवर सुरू आहे. पालिकेने नियुक्त केलेले बिल वितरक कर्मचारी कार्यक्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्था, सोसायट्या व संकुलांमध्ये बिल वाटप करत आहेत. संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक प्रवेश व सहकार्य करून वितरण मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai