पनवेल महासभेत विविध विषयांना मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 27
पनवेल ः महानपालिकेची महासभा दिनांक 23 जून रोजी महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये संपन्न झाली. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करुन मंजुरी देण्यात आली.
यावेळी मंचावर उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, उपसचिव अक्षय कदम उपस्थित होते. पनवेल पालिकेकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 29 (अ) नुसार प्रभाग समित्या स्थापन करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली व विषय मंजूर करण्यात आला. पनवेल शहरासाठी ‘शहर हवामान कृती योजना’ तयार करण्याकरिता त्रयस्थ संस्थेच्या नियुक्तीबाबत या कामाकरिता रुपये 64 लाख रक्कमेच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. खारघर येथील से. 12, भुखंड क्र.01 या उद्यानाचे नुतनीकरण करणे तसेच सेक्टर 14, भुखंड क्र.09 येथे उद्यान विकसित करण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याबाबतचा विषयास मंजुरी देण्यात आली.
पनवेल महापालिकेकरीता कार, जीप, इनोव्हा, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक, रुग्णवाहिका व इलेक्ट्रिक (कार/जीप) वाहने वाहनचालकासह भाडेतत्वावर पुरविणे या कामाची ई निविदा मागविणेस मंजूर मिळाली आहे. प्रभाग क्र.20 भिंगारी गावामधील अंतर्गत पावसाळी गटारींचे बांधकाम करणे, पालिका नवीन मुख्यालय इमारती समोरील रस्त्यावर डेकोरेटीव्ह पथदिप खांब उभारुन कार्यान्वित करणे, प्रभाग समिती ब मधील कळंबोली गावाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून ते नारायण जाधव चाळ पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटाराचे बांधकाम करण्याचा मंजुरी मिळाली आहे.
देहरंग धराणातून पनवेल शहराकरीता वाढीव पाणी पुरवठा योजना करणेकामी प्रस्ताव जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र नागरी पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुर्नवापर योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यतेकरीता शासनास सादर करणेबाबतचा विषय स्थागित करण्यात आला. देहरंग येथे पाणी साठवणाकरीता बॅरेज बांधणे प्रस्ताव केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंडस् अंतर्गत प्रशासकीय मान्यतेकरीता सादर करणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. प्रभाग समिती ड, प्रभाग क्र. 19, अं.भू.क्र. 241,242 पार्ट पनवेल या भूखंडावरती दुकाने व बहुमजली वाहनतळ बांधणे प्रस्ताव केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंडस् अंतर्गत प्रशासकीय मान्यतेकरिता सादर करणेबाबतचा विषय मंजूर करण्यात आला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यांत्रीकी पध्दतीने धुरिकरण व फवारणी सेवा पुरविणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai