केतन हत्याकांड प्रकरणात सरकारी वकील नियुक्त
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 23
मुंबई ः पुण्यात गाजलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलिसांची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी जेष्ठ वकीलाची नियुक्ती केली आहे.
पुणे येथील 26 वर्षीय व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल यांचा मृत्यू हा अपघात नसून त्यांची होणारी पत्नी सिया गोयल हिने आपल्या प्रेमीच्या मदतीने केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहागड किल्ल्यावर 18 जून 2026 रोजी ट्रेकिंग दरम्यान केतन यांना 400 फूट खोल दरीमध्ये ढकलून हत्या केली.
लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.
या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai