सराईत रिक्षाचोर गजाआड
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 33
नवी मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 12 चोरीच्या रिक्षा जप्त
नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सराईत रिक्षाचोराला अटक करून तब्बल 12 रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून 9 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 12 रिक्षा जप्त करण्यात आल्या असून चोरीचा 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोदकुमार शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरी व स्ट्रीट क्राईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले. 26 जुलै 2026 रोजी एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीवूड सेक्टर-42 येथे रस्त्यालगत उभी असलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जुलै महिन्यात नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे तसेच ठाणे परिसरातही रिक्षा चोरीच्या घटना वाढल्याने गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळ आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत अखेर पोलिसांनी अमन शिवशंकर पांडे (वय 22, रा. एसएस-3, सेक्टर-4, कोपरखैरणे) याला कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशीत आरोपीने नवी मुंबई व ठाणे परिसरातील एकूण 12 रिक्षा चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यामध्ये एनआरआय सागरी, रबाळे, तुर्भे, कोपरखैरणे, नेरूळ आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपी हा मोकळ्या जागी अथवा पार्किंग मध्ये लावलेल्या रिक्षांना मास्टक की चा वापर करुन चोरी करत व त्या रिक्षाि विक्रीच्या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करत होता.
100 टक्के मुद्देमाल हस्तगत
आरोपीकडून 9.55 लाख रुपयांच्या 12 चोरीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीविरुद्ध पुढील तपास मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai