आंतरराज्यीय चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 35
3 सराईत आरोपी जेरबंद, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातील 9 गुन्ह्यांची उकल
नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने चैन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये किमतीचे 95 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील एकूण 9 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोदकुमार शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व रस्त्यावरील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
15 मे 2026 रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून तिच्या गळ्याला दुखापत केली आणि युनिकॉर्न मोटारसायकलवरून पसार झाले होते. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळासह नवी मुंबईतील विविध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. त्यातून आरोपींची ओळख पटली. त्यानंतर कामोठे परिसरातून मिळालेल्या धाग्यांच्या आधारे मिरा रोड येथून दोन आणि बिहारमधून एक अशा तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, महेश जाधव तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
- अटक आरोपी
रियाज रमजान शेख उर्फ रियाज आलम रमजान अली (वय 42) कांदिवली (पूर्व), मुंबई; मूळ गाव समस्तीपूर, बिहार.जमालबादशा मनिरूल गाझी (वय 31) मिरा रोड; मूळ गाव उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल.आशिक बिल्ला गाझी (वय 22) मिरा रोड; मूळ गाव उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल.तीन्ही आरोपींना संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. - 9 गुन्ह्यांची उकल
या टोळीने नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरात चैन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 4 गुन्हे, ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1 गुन्हा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील 1 गुन्हा, मुंबई पोलीस आयुक्तालयातील 3 गुन्हे, अशा एकूण 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. - 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून 1 सोन्याचे मंगळसूत्र, 4 सोन्याच्या चैन, 1 तुटलेल्या सोन्याच्या चैनचे तुकडे एकूण 95 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 मोटारसायकली या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 12 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai