उत्तर अमेरिकेत मराठी सांस्कृतिक सोहळा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 29
देश-विदेशातील 2500 हून अधिकजण होणार सहभागी
नवी मुंबई : उत्तर अमेरिकेतील मराठी भाषिकांचा सर्वात मोठा आणि मानाचा सांस्कृतिक व सामाजिक सोहळा असलेला बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) अधिवेशन 2026 यंदा 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान अमेरिकेतील निसर्गरम्य सिऍटल शहरात दिमाखात पार पडणार आहे. जपूया संस्कृती, विणूया नाती या ब्रीदवाक्याखाली होणाऱ्या 22 व्या द्वैवार्षिक अधिवेशनात सुमारे 2500 हून अधिक मराठी बांधव, उद्योजक, कलाकार, साहित्यिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ एकत्र येणार आहेत. या सोहळ्याला प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. माधुरी कानिटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विद्यमान बीएमएम अध्यक्ष प्रसाद पानवळकर आणि संयोजक मोहित चिटणीस यांच्या नेतृत्वाखालील टीम गेल्या दोन वर्षांपासून सिऍटल डाउनटाउनमधील अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या सोहळ्याचे भव्य नियोजन करत आहे. या चार दिवसीय महोत्सवात महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, लोककला, संगीत आणि खाद्यपरंपरेचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळणार आहे. अवघा रंग एकचि झाला हे नाटक आणि नवोदित पिढीचा तीर्थ विठ्ठल हा शास्त्राय संगीताचा कार्यक्रम उत्तर अमेरिकेतील स्थानिक कलाकारांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. तसेच भारतातून येणाऱया नामवंत कलाकारांमध्ये ऑल दि बेस्ट हे नाटक, द फोक आख्यान, आरती अंकलीकर यांची संगीत रस-सुरस मैफल, प्रशांत दामले व संकर्षण कऱ्हाडे यांचा नाटकामागचे नाटक हा कार्यक्रम, तसेच डॉ. सलील कुलकर्णी, संजय उपाध्ये, सुनंदन लेले आणि निलेश ओक यांची उपस्थिती रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर जागतिक स्तरावर मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बी-कनेक्ट आणि रिअल इस्टेट एक्सपो याचेही विशेष आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय कलास्पंदन व कलादालनच्या माध्यमातून जागतिक कीर्तीचे चित्रकार प्रमोद कुर्लेकर आणि सुचित्रा भोसले यांच्या कलाविश्वाचा अनुभव घेण्याची संधी उपस्थित रसिकांना मिळणार असल्याची माहिती रश्मी खामकर-साठे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai