सुरक्षा, विकास अन् विकसित भारताचे लक्ष्य
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 15, 2026
- 17
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे देशाला संबोधन
नवी दिल्ली : 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित करताना भारताच्या विकासाचा प्रवास, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक प्रगती, लोकशाही मूल्य आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रामुख्याने भर दिसला. त्यांनी आता भारत थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केला आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य यावर भाष्य केले. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून, दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
भारताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली असून, जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहिली आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. भारताच्या विकासात सामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, महिला आणि तरुणांची भूमिका देशाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ चा उल्लेख करत भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचे कौतुक केले. तसेच, राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने घेतलेल्या कठोर निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. भारताला नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेने झालेली प्रगती ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेतील महत्त्वाची उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना त्यांच्या
देशाच्या लोकशाही मूल्यांचे, न्यायाचे आणि संविधानिक व्यवस्थेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचे त्यांनी स्मरण केले. ‘विकसित भारत 2047’ चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले. देशाची एकता, सुरक्षा, विकास आणि सर्वसमावेशक प्रगती यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दशकापेक्षा अधिक काळात भारताने वेगाने आणि सर्वसमावेशक विकास साधला आहे. वारसा आणि विकास यांचा समन्वय साधण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. विकासात अडथळे ठरलेले अनेक दशकांपूर्वीचे अडसर दूर करण्यात आले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांनी यावेळी डिजिटल इंडियाचा उल्लेख केला. दिल्ली ते गल्लीपर्यंत डिजिटल पेमेंटचा वापर होत आहे. देशाने उत्तम डिजिटल पायाभूत सुविधांपैकी एक व्यवस्था विकसीत केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम चा आदर्श हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे आधारस्तंभ आहेत. आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी आणि परस्पर संबंध दृढ करण्यासाठी भारताने अनेक देशांशी मुक्त व्यापार करार केले आहेत असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai