मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 33
स्पावर छापा; पाच पीडित महिलांची सुटका; तीन आरोपी अटकेत
नवी पनवेल : मसाजच्या नावाखाली स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने न्यू पनवेल येथील एका स्पावर छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुष आरोपीला अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यानुसार, 29 सप्टेंबर 2026 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना न्यू पनवेलमधील सेक्टर 17 येथील ‘हेवन थाई स्पा’मध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा करून स्पावर छापा टाकला. छाप्यावेळी स्पामध्ये पाच पीडित महिला आढळून आल्या. यामध्ये मिझोराम आणि मणिपूर राज्यातील महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात स्पामध्ये मसाजच्या कामाच्या नावाखाली महिलांना आणून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, स्पा मॅनेजर रोझी (32) आणि अन्य महिला आरोपी (18) तसेच पुरुष आरोपी सुहेल याकुब निजामी (48) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय राजेंद्र विठ्ठलराव कोलकर (50) हा पाहिजे आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, 1956 मधील कलम 3, 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 30 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. पथकाची कारवाईही कारवाई सहायक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंचलवार (, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली. पोलिसांनी सुटका केलेल्या पीडित महिलांना पुढील आवश्यक प्रक्रिया व संरक्षणासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai