पालिकेच्या 15 संवर्गांची निवडसूची जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 26
सरळसेवा भरतीतील 160 पदांसाठी गुणवत्ता यादी, निवडसूची व प्रतीक्षायादी प्रसिद्ध
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट-क व गट-डमधील पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. दि. 27 मार्च 2025 अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पात्र उमेदवारांची 15 संवर्गांची गुणवत्ता यादी, निवडसूची आणि प्रतीक्षायादी महापालिकेच्या संकेतस्थळावर 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत राज्यातील 28 परीक्षा केंद्रांवर 16 ते 19 जुलै 2025 दरम्यान वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या 16 सप्टेंबर 2026 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ही निवडसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी 30 संवर्गांचा स्कोअरकार्ड 11 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांची निवड सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा विचार करून गुणानुक्रमाने करण्यात आली आहे. प्रतीक्षायादीतील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील जागेस पात्र ठरत असल्यास त्यांचा संबंधित सामाजिक प्रवर्गासह खुल्या प्रवर्गातही समावेश करण्यात आला आहे. कागदपत्र पडताळणीनंतरच नियुक्तीनिवडसूचीत नाव आले म्हणजे नियुक्ती निश्चित झाली, असा अर्थ नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, नॉन-क्रिमीलेअर तसेच खेळाडू, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ आदी आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. सर्व पात्रता पूर्ण झाल्यानंतरच नियुक्ती आदेश दिला जाणार आहे.दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीपूर्वी वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करण्यात येणार असून, 40 टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व आढळल्यास किंवा संबंधित पदासाठी अपात्र ठरल्यास निवडसूचीतून नाव वगळण्यात येईल. कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार असून उमेदवारांनी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे पाहाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडसूचीची वैधता शासन निर्णयानुसार निर्धारित कालावधीपर्यंत राहणार आहे. नियुक्तीबाबत अंतिम निर्णय आयुक्त तथा नियुक्ती प्राधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे राहणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai