राज्यात कोरोनाचा तिसरा बळी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 23, 2020
- 560
कोरोना बाधितांचा आकडा 89 वर
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा बाधितांचा आकडा 89 व गेला असून आणखी एक बळी गेला आहे. राज्यात कोरोनाने तीसरा बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 16
मुंबई - 39
नागपूर- 4
यवतमाळ - 4
नवी मुंबई - 3
कल्याण - 4
अहमदनगर - 2
रायगड - 1
ठाणे - 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai