महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी

वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई : वाढत चाललेल्या कोरोनाने महाराष्ट्रात चौथा बळी घेतला. नवी मुंबईतील वाशी खासगी रूग्णालयात या कोरोना बाधित 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, ही महिला गोवंडित राहणारी असून तिला वाशीमधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 23 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच काल मुंबई, सांगली, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 649 कोरोना बाधित असून त्यातील 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.