डी.वाय.पाटील कॉलेज परिसरात आग
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 18, 2020
- 769
नवी मुंबई : डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज परिसरात भीषण आग लागली होती. कॉलेज परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या, निर्माणाधीन इमारतीला आग लागली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. थर्माकोलने पेट घेतल्याने आग आणखी भडकली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली आहे.
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, तपास सुरू आहे. आगीतून उठलेल्या धुरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. डी वाय पाटील प्रशासनानं एक नवीन इमारत बांधायला घेतली होती. या इमारतीच्या बांधकामासाठी आणलेल्या सामानाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी थर्माकॉल जास्त प्रमाणात असल्यानं आगीचा भडका उठाला होता. या आगीची तीव्रता जास्त होती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आता आग आटोक्यात आली आहे. आग लागलेल्या इमारतीच्या काही अंतरावर मुलींचं वसतिगृह आहे. याशिवाय डी वाय पाटील स्टेडियम आणि डी वाय पाटील हॉस्पिटल देखील या इमारतीपासून काही अंतरावर आहे. या बाजूला आग पसरू नये यासाठीही अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai