शेतघर कोसळून मुलगी ठार

पनवेल : पनवेलजवळील पेणधर गावातील एकमजली शेतघर मंगळवारी पहाटे कोसळले. यात ढिगार्‍याखाली सापडून एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तीन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

पेणधर गावातील भूखंड क्रमांक 27 वरील शेतजमिनीवर मुन्ना हरिजन यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून राहत होते. त्यांचे राहते एकमजली घर धोकादायक झाले होते. त्यामुळे ते भाडयाने घर शोधत होते. मंगळवारी अचानक ही दुर्घटना घडली. हिना हरिजन असे या घटनेतील मृत मुलीचे नाव आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला याची माहिती मिळल्यानंतर ते घटनास्थळी धाव घेत ढिगार्‍याखालून हंसिका, अनपन आणि संतोष या तीन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेनंतर पालिका सदस्यांनी या ठिकाणी भेट दिली.