दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सत्यनिष्ठतेची शपथ
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 27, 2026
- 22
नवी मुंबई ः दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी उपस्थित कर्मचारी आणि अधिकारी यांना सत्यनिष्ठतेची शपथ दिली. दक्षता सप्ताह ही औपचारिकता न राहता दैनंदिन कामकाज पार पाडताना देखील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून पारदर्शकता जोपासायला हवी असे आवाहन मुद्गल यांनी केले.
केंद्रीय दक्षता आयोगातर्फे भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार देशभरातील शासकीय व निमशासकीय संस्था आणि कार्यालयांमध्येही या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी; समाजाच्या अशा विविध स्तरांतील घटकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण होऊन भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे, या उद्देशाने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. समृद्धीसाठी सत्यनिष्ठा ही या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना आहे.या प्रसंगी शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, सुरेश मेंगडे, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, प्रीतमसिंग राजपूत, व्यवस्थापक (कार्मिक), सुभाष पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन, नितीन कांबळे, सरचिटणीस, सिडको एम्प्लॉईज युनियन यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सुरेश मेंगडे यांनी सिडको प्रशासनामधील पारदर्शकता अधिक वाढीस लागावी याकरिता दक्षता विभागातर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे डी. बी. पुजारी, विधी सल्लागार, मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंध या विषयावर व्याख्यान दिले. दरवर्षीप्रमाणे सिडको महामंडळामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सिडकोतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ङ्गसमृद्धीसाठी सत्यनिष्ठाङ्घ या विषयावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सप्ताहाच्या जनजागृतिसाठी प्रभात फेरी, श्री. योगेश धनगर, सायबर सुरक्षा सल्लागार यांचे सायबर प्रशिक्षण, प्रल्हाद कचरे, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) यांचे जमीन नियोजन आणि विकासविषयक बाबीमध्ये दक्षता दृष्टीकोन तसेच राजेश शिर्के, अग्निसुरक्षा लेखापरीक्षक तथा सेवानिवृत्त नौसेनाधिकारी यांचे अग्निसुरक्षा या विषयावरील व्याख्यानदेखील आयोजित करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai