टोल दरवाढीविरोधात मनसे आक्रमक
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 02, 2020
- 643
मुंबई : मुंबईत 1 ऑक्टोबरपासून टोल दरात वाढ करण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आधीच महागाई आणि कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना वाढलेल्या टोल दरांचा सामना करावा लागणार आहे. टोलच्या दरात 5 ते 25 रूपयांची वाढ झाली आहे. याविरोधात मनसेने गुरुवारी आंदोलन केले. काही वाहनांना पैसे देऊ नये, असे सांगत गाड्या टोलनाक्यावरुन मार्गस्थ केल्या.
मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल दरवाढ आजपासून लागू होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे लोकल बंद अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यात झालेल्या दरवाढीमुळे महागाईत अधिकच भर पडेल. रोज वाहतूक कोंडीत अडकणार्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. ही दरवाढ सरकारने मागे घ्यावी म्हणून गुरुवारी नवी मुंबईतल्या ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन केले. आंदोलन करत मनसेने वाहने मोफत सोडली. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना बाजूला करत टोल नाका पुन्हा सुरु केला. यावेळी सौम्य आंदोलन करत असून भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai