आरसा समोर घेवून जसा स्वतःला माझ्यात बघते मीरा म्हणे, तुझ्यामध्ये कान्हा मला नेहमीच राधा दिसते
हट्ट कधी करते कधी बालीश ती पण होते भांडण करून तुझ्याशी कधी रुसून मग ती बसते हाक ऐकून बासरीची मग लगेच धावून येते मीरा म्हणे, तुझ्यामध्ये कान्हा मला नेहमीच राधा दिसते दूर उभी धुंदीत तुझ्या
मीरा ही भान हरपून जाते उगाच लपून छपून कधी तुझे मन ती वाचू पाहते धडधड होऊन काळजाची तुझ्या मिठीत येवू बघते मीरा म्हणे, तुझ्यामध्ये कान्हा मला नेहमीच राधा दिसते
राधा असते माया तर कधी प्रियेसी असते कधी होवून सख्या सारखी कान तुझे पिळते सगळ्याच नात्यांची गोडी तुला एकाच नात्यात दिसते मीरा म्हणे, तुझ्यामध्ये कान्हा मला सारखी राधाच दिसते
मीरा असते वादळ वारे जे मनात तुझ्या येऊ पाहते होवुनी ती सरी प्रितीची तुला भिजवून हसू पाहते त्या प्रितीच्या रंगामध्ये स्वतः रंगून जगते तुला मात्र रंगून सुद्धा अलिप्त राहता येता तुझ्यामध्ये आता कान्हा फक्त राधाच वसते
मीरा उरते नेहमीच एकटी तुझ्यासाठी मात्र राधा असते जरी दुरावा सात जन्मीचा ती तुझी होऊ पाहते तुझी होवून जाता-जाता ती कृष्ण बावरी बनते मीरा म्हणे, तुझ्यामध्ये अजूनही कान्हा का रे राधाच दिसते....
(मिरा पितळे)
रिपोर्टर
Aajchi Navi Mumbai
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai