खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


...तर प्रदूषण नियंत्रण मंडळावर मोर्चा

आमदार गणेश नाईक यांचा पालिका आयुक्तांना इशारा 

नवी मुंबई ः कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नवी मुंबई पालिकेची निवडणुक लांबल्याने सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट लागू असून सर्व कारभार आयुक्तांच्या हाती गेला आहे. त्यामुळे आमदार गणेश नाईक हे पालिका आयुक्तांची भेट घेऊन दर आठवड्याला शहरातील सोयी सुविधांसह कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा घेतात. यासंदर्भातील बैठक आज सोमवारी पार पडली. यामध्ये इमारतीवरली वेदर शेड, आयसीसीयु बेडची संख्या, शहरातील वाढणारे प्रदुषण तसेच सोशल डिस्टंसिंगसाठीचे उपाय यावर चर्चा करण्यात आली असून त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

नवी मुंबईत वाढणार्‍या प्रदूषणाविरोधात आ.नाईक यांनी या बैठकीमध्ये आक्रमक भूमिका मांडली. जर प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर जनतेला होणारा त्रास पाहता प्रदूषण नियंत्रण मंडळावर मोर्चा नेण्यात मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला. तसेच आ.नाईक यांच्या सूचनेनुसार नव्याने तयार झालेल्या महापालिकेच्या विकास आराखड्यात सोसायट्या टेरेस वरील वेदर शेड नियमित करण्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या वेदर शेड नियमित करण्याच्या सूचनेसह हा विकास आराखडा महापालिकेने शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे तो लवकरच मंजूर होऊन आल्यावर इमारतींवरील वेदर शेड कायम होणार आहेत. हिवाळा ऋतूमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त होतो आहे. भविष्यात जर कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड सह आवश्यक सर्व  उपाययोजना आताच करण्याची सूचना नाईक यांनी आयुक्तांना यावेळी केली ही सूचना मान्य करत महापालिकेकडे सद्यस्थितीत 443 आयसी यू बेड असून त्यामध्ये आणखी 200 बेडची भर घालणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. सद्यस्थितीत दुकाने हॉटेल्स आणि इतर अस्थापना उघडी ठेवण्याची वेळ सकाळी सात ते पाच अशी असल्याने पाच च्या अगोदर खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते त्यामध्ये सोशल डिस्टंसिंग राखले जात नाही त्यामुळे दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत आणि हॉटेल्स आणि तत्सम आस्थापना रात्री बारा वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मागणी आ.नाईक यांनी केली त्यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दर्शवली.  

महापालिका आणि परिवहन सेवेमधील सर्व संवर्गातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक यांनी उपस्थित केला. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू करण्याचे आयुक्त बांगर यांनी मान्य केले. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासंबंधी माजी महापौर सागर नाईक यांनी विचारणा केली. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू असून इतर वर्गांमधील विद्यार्थ्यांना लिखित स्वरूपात अभ्यास देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. या बैठकीला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर जयवंत सुतार माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनावणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट