नवी मुंबईकरांनो सावधान!
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 28
4 पैकी 3 जणांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता; 54% नागरिक मधुमेहाच्या उंबरठ्यावर ; कोकिलाबेन हॉस्पिटलच्या ‘नवी मुंबई वार्षिक आरोग्य अहवाल’ जाहीर
नवी मुंबई ः वरवर निरोगी दिसणाऱ्या नवी मुंबईकरांच्या आरोग्यामध्ये अनेक गंभीर धोके लपलेले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने आपल्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या नवी मुंबई वार्षिक आरोग्य अहवालात शहरातील नोकरदार आणि व्यावसायिक वर्गामध्ये तपासणी केलेल्या 75 टक्क्यांहून अधिक नागरिकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता, तर 54 टक्के लोक प्री-डायबिटीज किंवा मधुमेहा वाढता धोका, ॲनिमिया आणि कोलेस्टेरॉलसारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.
एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या 32,253 एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप आणि 1,00,986 प्रयोगशाळा चाचण्यांच्या विश्लेषणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये 13,901 महिला आणि 18,352 पुरुषांचा समावेश असून तपासणी केलेल्या व्यक्तींचे सरासरी वय 44.8 वर्षे आहे. हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. शशिकांत पवार यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांत हॉस्पिटलने नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपचारांबरोबरच आजारांचे लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी यावर हॉस्पिटलचा विशेष भर असून, हा आरोग्य अहवाल आता दरवर्षी प्रसिद्ध केला जाणार आहे. हॉस्पिटलच्या डिपार्टमेंट ऑफ लॅबोरेटरी मेडिसिनच्या डायरेक्टर डॉ. पूनम गुप्ता यांनी सांगितले की, वरवर निरोगी दिसणाऱ्या अनेक व्यक्तींमध्येही हृदयविकार, मधुमेह आणि पोषणाशी संबंधित गंभीर धोके लक्षणांशिवाय वाढत आहेत. पण बऱ्याचदा त्यांची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. याच कारणामुळे वेळेत त्यांचे निदान आणि योग्य उपचार होऊ शकत नाहीत. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरू शकते.
अहवालातील धक्कादायक आकडे
- 75% पेक्षा अधिक नागरिकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता
- 24-25% नागरिकांमध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता (फेब्रुवारी 2026 मध्ये 27.3%)
- 54% नागरिक प्री-डायबिटीज किंवा मधुमेहाच्या धोक्यात
- प्रत्येक दुसऱ्या महिलेमध्ये ॲनिमिया
- 32% नागरिकांमध्ये वाढलेले (घातक कोलेस्टेरॉल)
- 30% नागरिकांमध्ये एकूण कोलेस्टेरॉलची पातळी जास्त
- लिपिड प्रोफाइल बिघडलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखर वाढण्याचा धोका 2.21 पट अधिक
- तज्ज्ञांचा इशारा
अहवालानुसार, व्हिटॅमिन डी व बी-12 ची कमतरता, वाढलेली रक्तातील साखर, महिलांमधील रक्तक्षय, वाढलेले एलडीएल आणि कोलेस्टेरॉल हे धोके एकत्रितपणे दिसून येत आहेत. त्यामुळे स्वतःला निरोगी समजणाऱ्या नोकरदार वर्गानेही दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai