पंढरपुरात भक्तीचा महापूर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 18
विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी पंढरीत; सुरक्षा व्यवस्थाही सज्ज
पंढरपुर ः यंदाची आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी होत असून, यासाठी पंढरपुर सज्ज झाले आहे. पंढरपुरात लक्षावधी वारकऱ्यांचा महामेळा जमला आहे. शासकीय महापूजा आणि वारकऱ्यांच्या महाप्रसादाची तयारी पूर्ण झाली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात आणि पंढरपुरात वारकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली असून विठूनामाचा गजर सुरू आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात लाखो वारकरी दाखल झाले आहेत. विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या असून वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनाने वाहतूक, दर्शन व्यवस्था तसेच ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्गांचे नियोजन केले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि प्रशासन शासकीय महापूजा व दर्शनासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदा या पुजेसाठी 14 पुजारी सज्ज आहेत. आषाढी ते कार्तिकी एकादशी या कालावधीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय कायम असून सर्व भाविकांना समान रांगेतून दर्शन दिले जात आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुमारे 5,500 विशेष एसटी बस चालवण्याची व्यवस्था केली आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वे आणि प्रशासनाकडून विशेष गाड्या व मोफत महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai