शुटिंगबॉल खेळाला नवसंजिवनी मिळणार

खेळाडूंच्या समस्या सोडिवण्यासाठी एकीकरण समितीची स्थापना  

नवी मुंबई : शुटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या नोंदणीकृत संस्थेशी संलग्न असलेल्या राज्य असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्या मनमानीमुळे राज्यातील शुटिंगबॉल खेळाडूंची सुरु असलेली परवड व पडझड थांबविण्यासाठी एकीकरण समितीची स्थापना करुन शुटिंगबॉल खेळाला नवसंजिवनी देण्याचा निर्णय राज्यातील शुटिंगबॉल खेळाडूंच्या पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 

शासनाच्या क्रिडा विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या शुटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेशी संलग्न असलेल्या राज्य असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी राज्यातील शुटिंगबॉल खेळ आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या निर्णयामुळे शुटिंगबॉल खेळाडूंची मोठी परवड आणि पडझड सुरु झाली आहे. यात असोसिएशनने आयोजित केलेल्या सामान्यांमध्ये खेळाडूंना खेळासाठी बंदी घालणे तसेच राज्य शासनातर्फे देण्यात येणारा शिवछत्रपती पुरस्कारापासून शुटिंगबॉल खेळाडू सन 2009 पासून वंचित राहिले आहेत. खेळाडू अतिशय मेहनतीने संघासाठी आणि राज्यासाठी खेळत असतो. 

आपल्या रक्ताचे पाणी करतो, तरी देखील त्याला मिळणर्‍या फायद्यांपासून वंचित रहावे लागते. या प्रमुख कारण म्हणजे असोसिएशनने घेतलले निर्णय कारणीभूत आहेत. असोसिएशनने घेतलेले सर्व निर्णय शुटींगबॉल खेळाडूंना मारक ठरत असल्याचे राज्यातील शुटिंगबॉल खेळाडू एकत्रित येऊन शुटिंगबॉल  या खेळाला पुन्हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी एकीकरण समितीची स्थापना केली.  

असोसिएशनने राज्यातील खेळाडूंवर घातलेली बंदी मागे घेवून पुन्हा शुटिंगबॉल स्पर्धेसाठी सहभागी करुन घेण्याचा निर्णय देखील एकीकरण समितीने यावेळी घेतला. तसेच शुटिंगबॉल खेळाडूचे शुटिंगबॉल फेडरेशनचे माजी उपध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना पुन्हा शुटिंगबॉल खेळ व स्पर्धेसाठी पीय होण्याची विनंती देखील केली. एकीकरण समितीच्या स्थापनेमुळे शुटिंगबॉल खेळला चांगले दिवस येतील अशा भावना शुटिंगबॉल खेळाडूंनी व्यक्त केली.