स्वच्छता कर्मचार्‍याचे निधन

नवी मुंबई ः सानपाडा प्रभाग क्र. 74 येथे कार्यरत असणारे स्वच्छता कर्मचारी आर मुरगन गोपाळ अर्जुन (अरुण) यांचे आज 26 ऑक्टोबर 2020 रोजी अकस्मात दुर्देवी निधन झाले. आपले कार्य तत्परतेने व प्रामाणिकपणे पार पाडून त्यांनी शहर स्वच्छतेत हातभार लावला. रस्ता, गल्लीबोळा जेथे अस्वच्छता दिसेल तिथे ते स्वतः जातीने लक्ष घालून साफसफाई करत. त्यांच्या जाण्याने परिसरातील रहिवाशांनी दुःख व्यक्त केले.  

प्रभागात साफसफाई बाबत अरुणजी नेहमीच तत्पर असायचे. आमच्या 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतही त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या जाण्याने आम्ही एक प्रामाणिक कर्मचारी गमावला असल्याची भावना स्थानिक माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी व्यक्त केली. शिवसेना शाखा सानपाडा व प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना फेसबुक पोस्टद्वारे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.