कोरोना चाचणी 700 रुपयांवर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2020
- 971
मुंबई : राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर आता कमी केले असल्याची दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना चाचणीची किंमत आता जवळपास 280 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने सदर निर्णय निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल.
याआधी कोरोनाची चाचणी करण्यासाठी 980 रुपये मोजावे लागत असत. पण आता ही किंमत 700 रुपये करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना चाचणीसाठी काही हजार रुपये मोजावे लागायचे. जर घरी जाऊन एखाद्या व्यक्तीचा स्वॅब घेतला तर त्यासाठी वापर केल्या जाणार्या पीपीई कीटचे सुद्धा वेगळे पैसे मोजावे लागत होते. ज्यावर नंतर नियंत्रण आणले. आता चाचणी आणखी स्वस्त केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai