ब्रिटन-भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 21, 2020
- 1168
नवी दिल्ली : जगभरातील देश कोरोना विषाणूशी लढत असताना आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणार्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारनेही भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते, त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.
काय आहे प्रकार?
इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai