खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


दाखल्यांमध्ये प्रलंबितता असल्यास कारवाई होणार

आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

नवी मुंबई ः जन्म, मृत्यू व विवाह दाखले नागरिकांना विहित वेळेत मिळालेच पाहिजेत यासाठी आपल्या नागरी सुविधा केंद्रातील कार्यप्रणालीत आवश्यक बदल करावेत व नागरिकांना विनासायास दाखले उपलब्ध होण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्त बांगर यांनी वेब संवादाव्दारे घेतलेल्या विशेष बैठकीत सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दिले. दाखले वितरणामध्ये प्रलंबितता असल्यास कारवाई करण्याचा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला. 

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली विभाग कार्यालयास दिलेल्या अचानक भेटीमध्ये जन्म, मृत्यू दाखल्यांमध्ये 2 महिन्यांहून अधिक कालावधीची प्रलंबितता आढळल्याने जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती. तशी परिस्थिती इतर कार्यालयांत नसावी यादृष्टीने आयुक्तांनी बुधवारी विशेष बैठक घेतली. यावेळी दोन्ही परिमंडळांचे उपआयुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे समवेत वेबसंवादाद्वारे सर्व आठही विभाग कार्यालयांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या कार्यालयातील जन्म, मृत्यू व विवाह दाखल्यांबाबतच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. जन्म, मृत्यू व विवाह दाखले नागरिकांना विहित वेळेत मिळालेच पाहिजेत यासाठी आपल्या नागरी सुविधा केंद्रातील कार्यप्रणालीत आवश्यक बदल करावेत व नागरिकांना विनासायास दाखले उपलब्ध होण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्त बांगर यांनी वेब संवादाव्दारे घेतलेल्या विशेष बैठकीत सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दिले. जन्म, मृत्यू, विवाह यासारख्या आवश्यक असणार्‍या दाखल्यांबाबत नागरिकांना बरेचदा कार्यालयात यावे लागते व त्रास होतो, हे टाळण्याकरिता दाखले उपलब्ध करून देण्यात कोणतीही प्रलंबितता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देत नागरी सुविधा केंद्रात कार्यरत कर्मचार्‍यांकडून ही कामे सुव्यवस्थित रितीने करून घेण्याची जबाबदारी विभाग अधिकारी यांची आहे असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बाळाचा जन्म झाल्यानंतर रुग्णालयांमार्फत 2 दिवसात याबाबतच्या शासकीय पोर्टलवर संगणकीय नोंदणी व्हायला हवी. तसेच नोंदणी करताना त्यामध्ये बाळाच्या आई, वडिलांच्या आधारकार्डची नोंदणी आणि मोबाईल क्रमांकासह ईमेलची नोंदणी करण्याच्या सूचना सर्व रुग्णालयांना लेखी पत्राव्दारे कळवाव्यात असे आयुक्तांनी वैद्यकीय आऱोग्य अधिकारी यांना निर्देशित केले. यावेळी प्रत्येक विभाग कार्यालयाने मागील वर्षभरात दिलेल्या जन्म, मृत्यू, विवाह दाखल्यांच्या संख्येचा आढावा घेताना आयुक्तांनी त्या विषयीच्या तक्त्यामध्ये प्रत्यक्षात किती दाखले वितरित केले याचा स्वतंत्र कॉलम वाढविण्याची सूचना केली. विवाह नोंदणीकरिता वधू-वर आणि साक्षीदार यांना प्रत्यक्ष स्वाक्षरीसाठी विभाग कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज असते हे लक्षात घेतले तरी स्वाक्षर्‍या झाल्यानंतर प्रत्यक्ष दाखला देण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी असेही आयुक्तांनी सूचित केले. नागरिकांना दाखले मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी  दिले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट